‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ : मोठ्यांनाही आपला दृष्टीकोन तपासून पहायला लावणारी छोट्यांची रंजक सृष्टी आणि दृष्टी
मुलांना काय समजते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे, पण त्यांची समज अनेकदा मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालते. वर्तमानातील अनेक चुकीच्या आणि घातक बाबींवर उपाय शोधायचे असतील आणि संविधानिक मूल्यं जपायची असतील, तर या साऱ्या घटनांकडे समाजधुरिणांनी मुलांच्या दृष्टीने आणि दृष्टीकोनातून पाहायला हवे. असे घडले, तर त्यांना त्यांच्या भूमिका अवश्य तपासून पाहाव्याशा वाटतील, हा विचार मांडणारी ही कादंबरी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे.......